fbpx

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफ करा-एनएसयुआय

टीम महाराष्ट्र देशा:- महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा या परिसरातील भीषण पुरामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यासाठी सर्वच क्षेत्रातून मदत येत आहे.त्याचं पार्शभूमीवर अनोख्या पद्धतीने भारतीय विद्यार्थी काँग्रेस तर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.

आज एनएसयुआय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ युनिट तर्फे कुलगुरू यांना पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफ करण्यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण व परीक्षा शुल्क माफ करून त्यांना मानसिक व आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे एनएसयुआयचे अध्यक्ष सतीश पवार यांनी केली आहे.

दरम्यान अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न, वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात आता महापुरामुळे रोगराई पसरू लागली आहे. या हलाखीच्या परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे.