इस्लामाबाद : नेहमीच भारताबद्दल आगपाखड करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या आणखी वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावेळी त्यांनी लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीला, अश्लीलता जबाबदार असल्याचं वक्तव्य केलंय. तर त्यांनी यासाठी बॉलिवुड आणि पाश्चिमात्य संस्कृती जबाबदार असल्याचं सांगितलं आहे.
4 एप्रिलला ‘टेलीथॉन’ नावाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी एका सामान्य नागरिकाने देशात वाढणाऱ्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या घटनांबाबत सरकारची योजना काय? प्रश्न विचारला असता इम्रान यांनी समाजाला ‘अश्लीलतेपासून’ स्वत:चं रक्षण करावं लागेल असं इम्रान खान म्हणाले होते. ते पुढे म्हणाले, ‘ही पर्दा कन्सेप्ट काय आहे? जेणेकरून आपल्याला मोह होऊ नये. प्रत्येक व्यक्तीमध्ये इच्छाशक्ती नसते. याच कारणामुळे आपल्या धर्मात शरीर झाकण्यावर जोर दिला जातो. जेणेकरून लाज कायम ठेवली जाईल. समाज प्रलोभन नियंत्रित ठेवता येईल. प्रत्येक व्यक्तीकडे स्वनियंत्रणाची ताकद नसते.’
या वक्तव्यानंतर इम्रान खान यांच्यावर प्रसारमाध्यमांमधून तसेच विविध क्षेत्रांतून टीका करण्यात येत आहे. यामध्ये आता त्यांच्या माजी पत्नी जेमिना गोल्डस्मिथ यांनीदेखील इम्रान यांना प्रत्युत्तर दिले आहे. जेमिमा यांनी कुराणाचा दाखला देत पुरुषांनी बुरखा घालावा असा सल्ला दिला आहे.
I'm hoping this is a misquote/ mistranslation. The Imran I knew used to say, "Put a veil on the man's eyes not on the woman." https://t.co/NekU0QklnL
— Jemima Goldsmith (@Jemima_Khan) April 7, 2021
जेमिमा यांनी ट्विट करत कुराणाचा दाखला देत बुरख्यात राहण्याची जबाबदारी पुरुषांची असल्याचा दावा केला आहे. ‘तुमच्या समर्थकांना सांगा की डोळ्यावर संयम ठेवण्यासाठी तुमचे प्रायव्हेट पार्ट बुरख्यामध्ये ठेवा.’ मी ज्या इम्रान खान यांना ओळखत होते त्यांचं पुरुषांच्या डोळ्यावर बुरखा असावा असं मत होतं, असा दावा देखील जेमिमा यांनी केला आहे. तर इम्रान खान यांची दुसरी पत्नी रेहम खान या वादात त्यांना कमी बोलण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस नेते संजय निरुपम यांची ठाकरे सरकारवर टीका
- ‘मला कुणाशी वाद घालायचा नाही आम्हाला आठवड्याला 40 लाख वॅक्सिन लागतात तेवढ्या द्या’
- ‘कर नाही त्याला डर कशाला? अनिल परबांनी चौकशीला सामोरं जावे’, चंद्रकांत पाटलांचे आव्हान
- लग्नासाठी प्राचीने ठेवली ‘ही’ अट…
- बीड; बनावट मद्य कारखान्यावर छापा, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई