दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत मजबूत आहे, परंतु रोजगाराच्या संधी नसल्यामुळे पुढील दहा वर्षांत समस्या अधिक वाढू शकतात. महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने आर्थिक संकट येऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच ते असेही म्हणाले “आपण आता स्वस्थ बसता काम नये. आपल्याला आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे. परंतु मोदी सरकार फक्त त्यांची स्तुती करणाऱ्यांनाच योग्य मानते, बाकी सगळ्यांना चुकीचे मानले जात आहे.”
एका खासगी वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, “जागतिक अर्थव्यवस्था संकटातून जात आहे. कोविडमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आपण अजूनही गरीब देश आहोत. गेल्या काही वर्षात नोकऱ्यांची गरज वाढली आहे मात्र संधी कमी आहेत. आपल्याला लोकांचे कौशल्य वाढवण्याबरोबरच शिक्षण क्षेत्राला गती देखील द्यावी लागणार आहे. येत्या 10 वर्षात जे तरुण पदवीधर होतील, त्यांना स्किल बेस एज्युकेशन द्यावे लागेल, तरच नोकरीच्या संधी वाढतील.”
पुढे रघुराम राजन असेही म्हणाले की, “लोकशाहीत संवादाला खूप महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांत, सरकारने नोटाबंदी, तीन कृषी कायदे यांसारखे व्यापक निर्णय कोणतीही सल्लामसलत न करता घेतले आहेत. ज्यामुळे नागरिक नाराज झाले आणि त्यांनी निर्णयांना विरोध केला. लोकशाहीत तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही संवाद साधता. संवाद हा नेहमी चालूच राहिला पाहिजे. महागाई ही गेल्या काही महिन्यांतील प्रमुख समस्यांपैकी एक आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी संसदेत झालेल्या चर्चेत सरकारने जाहीर केले की हे कोविड आणि युक्रेन-रशिया युद्धासारख्या बाह्य कारणांमुळे महागाई वाढली आहे, पण खरं सांगायचं तर ते तसे नाहीये.” तसेच आरबीआयने भारतातील परकीय चलनाचा साठा वाढवून भारताला पाकिस्तान आणि श्रीलंकासारख्या शेजारी देशांच्या समस्यांपासून वाचवण्यासाठी चांगले काम केले आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
तर नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेचा प्रमुख मापदंड म्हणून विकासाचा उल्लेख केला होता. सध्याची किरकोळ चलनवाढ 7 टक्के आहे आणि यूपीए सरकारच्या काळात चार वर्षांसाठी ती 9 टक्क्यांवर गेली होती, असे त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी रघुराम राजन यांच्या काही विधानांचा उल्लेख देखील त्यांनी त्यांच्या भाषणात केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Asia Cup 2022 : आशिया चषकात भारताविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाची घोषणा; ‘असा’ आहे संघ!
- Kapil Sibal | “…तर बहुसंख्य आमदार चुकीच्या पद्धतीने सरकार पाडून सत्ता मिळवतील” ; कपिल सिब्बल यांचा कोर्टात तगडा युक्तिवाद
- Subhash desai | “सामंतांवर झालेला हल्ला ही जनतेची उस्फुर्त प्रतिक्रिया”; सुभाष देसाईंकडून अप्रत्यक्ष समर्थन
- Sanjay Sirsath : उद्धव ठाकरेंचा फोटो कार्यालयातून काढून टाकल्यानंतर संजय शिरसाठ यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…!
- Subhash Desai | “गद्दारी करून जर कुणी फिरतं असेल तर…” ; उदय सामंत हल्ला प्रकरणावर सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<