हार्दिकला माझ्याकडे पाठवून द्या त्याचा खेळ सुधारेल ; माजी पाकिस्तानी खेळाडूची मागणी

टीम महाराष्ट्र देशा : हार्दिक पांड्याची फलंदाजी व गोलंदाजी उत्तम असताना पाकिस्तानी संघातील माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाक यांनी पंड्याच्या खेळात अनेक त्रुटी असल्याचे सांगितले. व पंड्याला फक्त दोन आठवडे माझ्याकडे पाठवा. त्याला जगातला सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू बनवतो असे म्हटले आहे. रज्जाक यांचा याबाबतचा सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आपण वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा क्रिकेट सामना बघितला. या सामन्यात आपण हार्दीकच्या खेळाचे आपण बारकाईने निरीक्षण केले. फलंदाजी करताना त्याच्या फुटवर्क, बॉडी बॅलेन्स यासह अनेक बाबतीत मोठ्या त्रुटी आहेत. असे पाकिस्तानी खेळाडू रज्जाक म्हणाला.

तसेच पांड्याला फक्त दोन आठवडे माझ्याकडे पाठवा. मी त्याच्यावर काम करीन, त्याला सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू बनवण्यासाठी मेहनत घेईन. त्याला काही टिप्स देऊन खेळ शिकवीन. दुबईत माझ्यासोबत पांड्या दोन आठवडे राहिला तर तो जगातील सर्वश्रेष्ठ हिटर आणि अष्टपैलू खेळाडू बनू शकतो, असे रज्जाक यांनी म्हटले आहे. याबाबत रज्जाक यांनी बीसीसीआयलाही अपीलदेखील केले आहे.

वर्ल्ड कप २०१९ मध्ये सध्या भारताची खेळी सर्वोत्कृष्ट असून गुणतालिकेत भारतीय टीमचा दुसरा क्रमांक आहे. तसेच हार्दिक पांड्याची खेळी उत्तम असून मागील वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात त्याने ३८ चेंडूत ४६ धावा केल्या तसेच वेस्ट इंडिजचा सलामीवीर सुनील एम्ब्रिसला बाद करत भारताला विजय मार्ग दाखवला.