शिवसेनेची नाटकं संपूर्ण महाराष्ट्राला समजलेली आहेत, आता शेतकरी फसणार नाहीत : राजू शेट्टी

blank

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पीक विमा कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत असलेलं पाहायला मिळत आहे. परंतु विरोधकांकडून शिवसेनेच्या या भूमिकेवर टीका होताना पाहायला मिळत आहे. स्वभिमानीचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावरून शिवसेनेवर टीका केली आहे.

या विषयी बोलताना राजू शेट्टी यांनी ‘विमा कंपन्यांबाबत उद्धव ठाकरे यांना अचानक जाग आली असून विमा कंपन्यांवर मोर्चा काढण्याआधी शिवसेनेने सरकारने विमा कंपनीशी काय करार केला आहे हे तपासावे. तो करार कोणत्या पद्धतीने का झाला याचा जाब मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विचारावा आणि मग मोर्चा काढण्याची भाषा करावी अस शेट्टी म्हणाले आहेत.

दरम्यान पुढे बोलताना शेट्टी यांनी ‘एकीकडे सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी करतो ही नाटक करायची ही शिवसेनेची नाटक संपूर्ण महाराष्ट्राला समजलेली आहेत. आता शेतकरी फसणार नाही अस विधान करत शिवसेनेवर निशाणा साधला.