कोपर्डीच्या घटनेला शांत आणि कोरेगाव भीमाला जिवंत झाले; असेल हिम्मत तर या चर्चेला – निलेश राणे

टीम महाराष्ट्र देशा: खासदार नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केल्याची टीका भारीप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली होती, आता दम असेल तर समोरा-समोर या आणि माहिती घ्या राणे साहेबांचा वेळ मी घेवून देतो म्हणत माजी खासदार निलेश राणे यांनी आंबेडकर यांना चर्चेच आवाहन केल आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत प्रकाश आंबेडकर यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. कोपर्डीच्या घटनेला शांत आणि कोरेगाव भीमाला जिवंत झाले, घरी बसून आंदोलन करणारे आंबेडकर संभाजी भिडेंना एक दिवसही तुरुंगात टाकू शकले नसल्याची खरमरीत टीका निलेश राणे यांनी केली आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात अडचणी आहेत आणि यापुढे येत राहतील. नारायण राणे यांनी हा प्रश्न अडचणीचा करून ठेवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील समितीने याबाबत केलेल्या चुकीच्या मांडणीमुळे हे आरक्षण मिळण्याऐवजी त्याचा बट्टय़ाबोळ करण्याचे कामच नारायण राणे यांनी केल्याचा घणाघात भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला होता