पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आणखी एक मोठा नेता भाजपच्या गळाला

Congress-NCP alliance for Sangli municipality possible?

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्ष बदलाचे वारे जोरात वाढत आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ताधारी भाजप व शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसत आहे. यामध्ये आता कोल्हापुरचे माजी खासदार धनंजय महाडिक हे भाजपच्या वाटेवर असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

२०१४ च्या मोदी लाटेत देखील धनंजय महाडिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. परंतु यंदा शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला आहे. महाडिक यांच्या पराभवाला राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद आणि कॉंग्रेस नेत्याचं असहकार धोरण कारणीभूत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे धनंजय महाडिक हे भाजप प्रवेशासाठी आग्रही असल्याचं बोलले जात आहे.

दरम्यान, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या सर्व नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात सुरुंग लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या