माजी आमदारांना चक्क सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन वाढवून हवी

aamdar

मुंबई: राज्य सरकारवर कर्जाचा बोजा असतांना माजी आमदारांनी पेन्शनवाढीची मागणी केली आहे. माजी आमदारांना चक्क सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन वाढवून हवी आहे.

कर्जबाजारी महाराष्ट्रासमोर माजी आमदार मालामाल होण्याची स्वप्न पाहत आहेत. महाराष्ट्र राज्यावर तब्बल साडेचार लाख कोटींचं कर्ज आहे. निधी अभावी सरकारने जल युक्त शिवारचे कामे देखील थांबवले आहेत.

माजी आमदारांनी विधानपरिषदेच्या सभापतींची भेट घेतली असून पेन्शन वाढीची मागणी केली आहे. आमदारांना सध्या महिन्याला ५० हजार रुपये पेन्शन मिळते.