fbpx

जावलीत सेनेचे बळ वाढले, भाजपला राम-राम ठोकत सदाशिव सपकाळ यांची ‘घर वापसी’

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व त्यानंतर भाजपमध्ये अशी भटकंती करूनही न्याय न मिळाल्याने माजी आमदार सदाशिव सपकाळ पुन्हा स्वगृही म्हणजेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. सपकाळ यांच्या प्रवेशामुळे जावलीत सेनेला बळ मिळाले आहे.

1995 ला सदाशिव सपकाळ शिवसेनेतून जावळीचेआमदार झाले. यानंतर 1996 मध्ये हिंदुराव नाईक निंबाळकर शिवसेनेतून खासदार झाले. पुढे सेनेची सत्ता गेल्यानंतर या नेत्यांनी शिवसेना सोडून दिली. आज सदाशिव सपकाळ काँग्रेस, भाजप असे पक्ष फिरत फिरत पुन्हा स्वगृही शिवसेनेत दाखल झाले आहेत.

सेनेचे उपनेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख हर्षल कदम, उपजिल्हा प्रमुख संजय मोहिते, संपर्क प्रमुख माजी आमदार दगडूदादा सपकाळ, एकनाथ ओंबळे यांच्या प्रयत्नाने मातोश्री निवासस्थानी सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सपकाळ यांना शिवबंधन बांधण्यात आले. या प्रवेशासाठी नितीन बानूगडे पाटील, हर्षद कदम, चंद्रकांत जाधव आदींनी प्रयत्न केले.

राष्ट्रवादीत घुसमट, अस्वस्थ उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबईत शिवसेना आमदारावर प्राणघातक हल्ला