fbpx

गळती सुरूच : कॉंग्रेसचा आणखी एक माजी आमदार घेणार भगवा खांद्यावर

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्ष बदलाचे वारे जोरात वाढत आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ताधारी भाजप व शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यात काँग्रेसला गळती लागली असून, आता दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्करही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माजी आमदार धनराज महाले यांच्यापाठोपाठ चारोस्कर शिवसेनेत परतल्यास दिंडोरीत शिवसेनेचे बळ वाढणर आहे. येत्या दोन दिवसांत चारोस्कर यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तसेच विधानसभेचा तोंडावर काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. अनेक जन भाजप आणी शिवसेनेत जाण्यासाठी उत्सुक आहेत. यामध्येच काँग्रेस मधील बडे नेते आणि राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे पुढच्या आठवड्यात भाजप मध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु आहे. इंदापूरची जागा काँग्रेसला सोडायला राष्ट्रवादी तयार नसल्याने हर्षवर्धन पाटील नाराज झाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांच्यासोबत इगतपुरीच्या कॉंग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी काल शिवसेना प्रवेश केला आहे. गावित यांनी मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला दिला होता त्यानंतर त्यांनी शिवबंधन हाती बांधले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या बातम्या