‘लोकसभेच्या सेमीफायनलचा आजचा निकाल पाहता पवारांनी आपली पार्टी काँग्रेसमध्ये विलीन करावी’

निलंगा /प्रा.प्रदीप मुरमे – देशाच्या पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी लोकसभेच्या सेमीफायनलचा आजचा हा निकाल पाहता आपली पार्टी काँग्रेस पक्षामध्ये विलीन करावी असे आवाहन माजी आमदार तथा साखर कामगार नेते काँ.माणिकराव जाधव यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना केले.

Loading...

आगामी लोकसभा निवडणूकीची सेमी फायनल म्हणून ओळखल्या गेलेल्या ५ राज्यातील निवडणूकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते.अवघ्या सहा महिन्यावर आलेल्या लोकसभा निवडणूकीची पूर्व परीक्षा म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात होते.त्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीचे कल पाहता काँग्रेसने भाजपाला जोरदार टक्कर दिली आहे.विकासाचा दावा फोल ठरवत मतदारांनी भाजपाला नाकारले आहे आणि काँग्रेसच भाजपाला सक्षम पर्याय आहे यावर शिक्कामोर्तब केले असल्याचे माजी आमदार जाधव म्हणाले.

शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाबाबत त्यांना छेडले असता शरद पवार हे देशातील एक अत्यंत चाणाक्ष राजकारणी असून देशातील राजकीय वा-याची दिशा ओळखून ते आपल्या राजकीय खेळ्या खेळत असतात.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षामध्ये आता वैचारिक मतभेद राहिले नाहीत.देशातील जनतेला मोदी-शहा ही जोडगोळी नको आहे.देशातील लोकांना काँग्रेस पर्याय आहे.त्यामुळे लोकभावनेची कदर व देशातील राजकीय वा-याची दिशा पाहता शरद पवार यांनी आपला पक्ष काँग्रेसच्या महाप्रवाहात विलीन करावा असे आवाहन केले .शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यास राज्याबरोबरच देशात वेगळे चिञ दिसेल व याचा काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होईल.आजची वेळ ही पंतप्रधानपदाच्या चर्चेची नाही तर भाजपा सरकार हद्दपार करण्याची आहे .आगामी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस विजयी झाल्यास जेष्ठत्वाचा विचार करता निश्चितच पवारसाहेबांचा पंतप्रधानपदाचा विचार होवू शकतो असा विश्वास माजी आमदार जाधव यांनी व्यक्त केला.

पवारसाहेब यांची पंतप्रधानपदाची कदाचित ही शेवटची संधी असल्यामुळे त्यांनी याबाबत वेळीच योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना ते म्हणाले की आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.पण हा मतदारसंघ काँग्रेसने आपल्याकडे घ्यावा.पक्षश्रेष्ठीने येथून जेष्ठ नेते तथा माजी गृहमंञी शिवराज पाटील चाकूरकर यांना निवडणूकीत उतरवावे.उस्मानाबाद या मतदारसंघाबरोबरच अनेक मतदारसंघात याचा काँग्रेस आघाडीला फायदा होईल.आपणही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून आपण याबाबत मुंबईत पक्षाकडे मुलाखत दिली आहे.परंतु पक्षाने चाकूरकरसाहेबांना उमेदवारी दिल्यास आपण आपली उमेदवारीची मागणी मागे घेवू हे सांगायलाही माजी आमदार काँ.माणिकराव जाधव विसरले नाहीत.

भाजपला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया : शरद पवार

मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे – शरद पवार 

हिंमत असेल तर बारामतीत EVM घोटाळा करून दाखवा : अजित पवारLoading…


Loading…

Loading...