मी राजकारणातून निवृत्ती घेतोय ! हर्षवर्धन जाधवांचा मोठा निर्णय

jadhav

औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून सन्यास घेत असल्याचे जाहीर केले आहे. तर इथून पुढची सूत्र पत्नी संजना जाधव यांच्या हाती दिली असून नागरिकांनी त्यांच्याकडून आपल्या अडचणीत सोडवून घ्याव्यात असे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले आहे. एका व्हिडीओतून हर्षवर्धन जाधव यांनी आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला होता. दोन वेळा आमदार राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांना गेल्या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. हर्षवर्धन हे नेहमीच चर्चेत असयाचे. याशिवाय हर्षवर्धन जाधव हे भाजप खा. हर्षवर्धन जाधव यांचे जावई आहेत.

मात्र आज अचानक हर्षवर्धन जाधव यांनी आपली निवृत्ती जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हर्षवर्धन जाधव म्हणाले की, लॉकडाउन सुरु असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्याला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत अशी विनंती मी करतो.

तसेच प्रत्येक घरात वाद होत असतात. पण त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. मी संजना जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रावसाहेब दानवेंच्या आशिर्वादाने आणि नेतृत्त्वाखाली संजना जाधव उत्तुंग भरारी घेतील याबाबत मनात शंका नाही. त्यामुळे आपण सर्वांना राजकीय, शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असं जाधव म्हणाले आहेत.