नागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Satish-Chaturvedi

नागपूर : पक्षविरोधी कारवाया व पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेस पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. चतुर्वेदी यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी या संबंधिचा आदेश जारी करण्यात आला.

माजी मंत्री राहिलेल्या विदर्भातील एखाद्या नेत्याला पक्षातून काढून टाकण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना असून ही कारवाई चतुर्वेदी यांना मोठा धक्का मानली जात आहे. दुसऱ्या बाजूला सतीश चतुर्वेदी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाई नंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करणाऱ्या इतर नेत्यांचेही धाबे दणाणले आहे.

चतुर्वेदी यांच्या हकालपट्टी मागील प्रमुख कारणे

  • महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे करणे
  • चतुर्वेदी यांना शहर काँग्रेसतर्फे २५ जानेवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसात स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, चतुर्वेदी यांनी मुदत संपूनही स्पष्टीकरण सादर केलेले नाही.
  • नागपूर कॉंग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी प्रदेश काँग्रेसकडे चतुर्वेदी यांच्या हकालपट्टीची केलेली शिफारस
  • महापालिकेच्या निवडणुकीत पूर्व नागपुरातील प्रचार सभेत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यामागेही चतुर्वेदी यांचा सहभाग असल्याचा आरोप
    उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत वादविवाद निर्माण करणे
  • काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरांना मदत करणे, उघडपणे बंडखोर उमेदवारांचा प्रचार करणे
  • बऱ्याच कालावधीपासून पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप