या सरकारा सारखे निगरगठ्ठ सरकार पहिले नाही – राजेश टोपे

rashesh tope

अंबड: आमदार राजेश टोपे यांनी अंबड तालुक्यातील सुखापुरी येथे आयोजित विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी सरकारवर ताशेरे ओढले. राजेश टोपे म्हणाले की, “तुम्ही अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. जनतेला वाटले आमच्या पेक्षा काहीतरी चांगले करनार आमची सत्ता गेली आम्हाला वाटलं आम्ही खराब कामे केली असतील म्हणून तर जनतेने आम्हाला बाजुला बसवले. शिवसेना -भाजपाला राज्य करायला दिले तुमच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या.परंतु शासन त्यांची जवाबदारी योग्य पध्दतीने पार पाडत नाही. सरकार खुप बघीतले परंतु सध्याच्या सरकारा सारखे निगरगठ्ठ सरकार बघीतले नसुन यांना कशाचाच फरक पडत नाही” पुढे बोलतांना आमदार टोपे म्हनाले की,बोंडअळीचे नुकसान भरपाई व शेतकऱ्यांची कर्जमाफी जी तोंडाला पाने पुसनारी आहे.

Loading...

कर्जमाफीचे मिळवण्यासाठी सरकारवरती दबाव आणण्याचे प्रयत्न आमच्या कडुन चालु आहे. कर्जमाफी मधेही या शासनाने मोठ्याप्रमानात अटी घातल्या आहेत. ज्यामधे हिरवी यादी,लाल यादी,पिवळी यादी अश्या सर्व याद्याच केल्यात.आम्ही आमचे सरकार असताना सरसकट कर्जमाफी केली होती.तुम्ही तुमची कर्जमाफी दाखवा असे आवाहन राजेश टोपे यांनी विरोधकांना केले.

सुखापुरी येथे घनकचरा व सांडपानी व्यवस्थापन प्रकल्पाचे भुमिपुजन व आर-ओ पाणी फिल्टर चिलींग युनीटच्या उद्याटन करन्यात आले.कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी युवक शाखेचेही उद्याटन करन्यात आले. परीसरातील नागरीक या कार्यक्रमासाठी मोठ्या संखेने उपस्थित होते. तर कल्याण शिंदे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शाखा अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले.Loading…


Loading…

Loading...