यूपीए सरकारने चांद्रयान – २ लॉन्चिंगला केला ७ वर्षे उशीर – जी माधवन नायर

टीम महाराष्ट्र देशा : यूपीए सरकारने त्यांच्या काळात निर्णय घेण्यात दिरंगाई केल्याने चांद्रयान -२ लॉन्च करण्यास ७ वर्षे उशीर झाला असा गंभीर आरोप भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) माजी प्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे नेते जी माधवन नायर यांनी यूपीए सरकारवर केला आहे.

दरम्यान, यूपीए सरकारच्या काळातच २०११ साली चांद्रयान-२ लॉन्च करण्याची योजना आखण्यात आली होती परंतु तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारात निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने चांद्रयान-२ ला ७ वर्षे उशीर झाला आहे असा आरोप जी माधवन नायर यांनी यूपीए सरकारवर केला आहे.

नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर अशा योजनांवर जोर देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.Loading…
Loading...