Share

Salman Khan | एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीने सलमान खानवर केला विनयभंगाचा आरोप

बॉलीवूड अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) चे नाव घेत त्याच्यावर हल्लाबोल केला आहे. एका पोस्टमध्ये सोमी अलीने सलमान खान सोबतचा एक जुना फोटो शेअर करत त्याच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. ही पोस्ट सोमी आलीने पोस्ट करताच लगेच डिलीट केली. तिने तिच्या या पोस्टमध्ये सलमान खान व्यतिरिक्त सलमानला सपोर्ट करणाऱ्या अभिनेत्रींवर देखील हल्लाबोल केला आहे. सलमान आणि सोमी एकेकाळी एकमेकांना डेट करत होते. अलीकडच्या काळात सोमी अनेक वेळा सलमान खानवर आरोप करताना दिसत आहे.

सोमी अलीने नुकताच स्वतःचा आणि सलमान खानचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देतील लिहिले होते की,”आता खूप काही होईल. मला वकिलाच्या धमक्या देऊन भारतामध्ये माझ्या शो वर बंदी आणली. तू खूप भित्रा आहेस. तू जर मला पोलिसांची भीती दाखवत असशील, तर मी माझ्या संरक्षणासाठी पन्नास वकील उभे करू शकते. ते सगळे मला सिगरेटीच्या चटक्यापासून आणि वर्षानुवर्ष माझ्यावर होणाऱ्या शारीरिक छळापासून मला वाचवतील.”

Salman khan | एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीने सलमान खानवर केला विनयभंगाचा आरोप
Salman khan | एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीने सलमान खानवर केला विनयभंगाचा आरोप

सोमीने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की,”महिलांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषाला सपोर्ट करणाऱ्या त्या सर्व महिला कलाकारांना लाज वाटली पाहिजे. सोमीने पोस्ट शेअर करत असताना त्यामध्ये कोणत्याही कलाकाराचे नाव घेतलेले नसले तरी सलमान खानसोबत फोटो शेअर केल्यानंतर त्याने या सर्व गोष्टी केल्या आहेत, असा अंदाज बांधता येऊ शकतो.

यावर्षी मार्च महिन्यामध्ये सोमीने सलमान खानच्या मैने प्यार किया या चित्रपटातील एक फोटो शेअर केला होता. सोमीने त्या फोटोला कॅप्शन दिले होते की,”बॉलीवुडचा हार्वे वाइनस्टीन, तुझा लवकरच पर्दाफाश होईल. तुझ्या ज्या महिलांवर अत्याचार केले आहेत, त्या नक्कीच एक दिवस पुढे येऊन सगळे सत्य सांगतील.”

महत्वाच्या बातम्या 

बॉलीवूड अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) चे नाव घेत …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now