भाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा

amit_shah

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत मतभेद आता समोर येवू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या एकाधिकारशाहीला आता पक्षातूनच आव्हान दिलं जाऊ लागलं आहे. ‘भाजपला आता अटलबिहारी वाजपेयी यांच्या तत्वांचा विसर पडला आहे’ असं सांगत अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे.

नेमकं काय म्हटलंय गेगांग अपांग यांनी ?
‘भाजपला आता अटलबिहारी वाजपेयी यांच्या तत्वांचा विसर पडला आहे. पक्ष केवळ सत्तेसाठी वाटेल त्या थराला जात आहे आणि कार्यकर्त्यांना थोडंही महत्व दिलं जात नाही.पक्ष आणि मोदी सरकारकडूनही जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांची दखल घेतली जाताना दिसत नाही. पक्षाध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी वाजपेयींनी सांगितलेला राजधर्म आठवावा. अन्यथा इतिहास तुमचं मूल्यांकन करेन’

मोदींना बोलण्यासाठी स्क्रिप्टची गरज नसते, भाजपकडून मनमोहनसिंगांना उत्तर

इन्स्टाग्रामवर नमो लाट, सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये मोदी पहिल्या स्थानावर 

चार राज्याच्या निकालानंतर भाजपात फुट, नाना पटोले याचं भाकीत

‘ही’ आहे माझी जात ; जात सांगत मोदींचा कॉंग्रेसवर घणाघात 

Loading...

मोदींना मनीऑर्डर करणाऱ्या संजय साठे यांची PMO कडून दखल

Loading...