महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांच्या दाव्यांची एकट्या फडणविसांनी केली ‘चिरफाड’

devendra fadnvis

मुंबई : केंद्र सरकारडून दिल्या जाणाऱ्या मदतीवरून राज्य सरकार आणि विरोधी पक्षात जोरदार जुंपली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले दावे महाआघाडीने पत्रकार परिषद घेऊन खोडून काढल्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांच्या दाव्यांची अक्षरशः पिसे काढत चिरफाड केली आहे.

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या आकडेवारीनंतर, त्याला महाविकास आघाडीकडून उत्तर देण्यात आलं आहे. त्यासाठीच महाविकास आघाडीकडून आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील तर शिवसेनेकडून परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते.

यावेळी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला. ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आभासी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेला आम्ही प्रत्यक्ष उत्तर देतो,’ असा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला.

‘पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत गहू, तांदूळ आणि डाळ मिळून राज्य शासनाला मोठी मदत केल्याचं सांगितलं. पण हा निर्णय महाराष्ट्रापुरता नाही. देशासाठी निर्णय झाला. देवेंद्र फडणवीस काल म्हणाले होते की, राज्याला १७५० कोटी रुपयाचे गहू केंद्राने दिले पण हा गहू अद्याप महाराष्ट्राला मिळालेला नाही,’ असं परब यांनी सांगितले.

दरम्यान, करोनाच्या संकटाशी महाराष्ट्रशी लढतो आहे. २५ मार्च पासून केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केला या लॉकडाउनला दोन महिने होऊन गेले आहेत. या सगळ्या परिस्थितीत महाविकास आघाडी समर्थपणे काम करते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली योग्य पद्धतीने लढा देणं सुरु आहे,’ असं थोरात म्हणाले.

एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण ; आशिष शेलारांची महाविकास आघाडीवर घणाघाती टीका

तर, राज्य सरकारच अभासी आकडे दाखवत आहे. फेकाफेक करून आणि खोटं बोलून राज्याचं भलं होणार नाही. महाराष्ट्राचा मित्र कोण? आणि शत्रू कोण? हे राज्यातील जनतेला माहीत आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

केंद्राने राज्याला कापूस खरेदीचे पैसे दिले आहेत. केंद्राने राज्याला २६ मे पर्यंत ९ लाख ८८ हजार पीपीई किट्स आणि १९ लाख मास्क दिले आहेत. या पीपीई किट्स विकत घेण्यासाठी राज्याला ४६८ कोटी रुपयेही दिले आहेत. नोव्हेंबरपर्यंतचे जीएसटीचे पैसेही देण्यात आले आहेत, असं सांगतानाच मुंबईतील रुग्णालयात रुग्णांसाठी बेड नाही. टेस्टिंगची संख्याही कमी करण्यात आलीय. देशात करण्यात येत असलेल्या टेस्टमध्ये ५ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. मात्र महाराष्ट्रात ही संख्या १३ टक्के आहे. मे महिन्यात ही संख्या ३२ टक्के आहे. ज्या राज्यात देशातले ३३ टक्के रुग्ण आहेत, ज्या राज्यात करोना रुग्णांचा मृत्यूदर ४० टक्के आहेत. त्या राज्यातील राज्यकर्ते कशाच्या आधारावर स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत? असा सवाल फडणवीस यांनी केला.

सरकारकडून अभासी घोषणा केल्या जात आहेत. खोटे आकडेवारी देऊन, फेकाफेक करून महाराष्ट्राचं भलं होणार नाही. आम्ही महाराष्ट्राला मदत करायला तयार आहोत, पण फेकाफक होतच असेल तर सरकारचा पर्दाफाश करावाच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. भूमिपुत्रांना स्थलांतरीत मजुरांच्या जागी काम देण्याचं आम्ही नेहमीच स्वागत केलं आहे. या मजुरांना काम द्यायचंच असेल तर त्याच्याकडे जे स्किल आहे, तेच काम द्यावं लागेल, असंही ते म्हणाले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांच्या पत्रकार परिषदेचा केला पंचनामा, सर्व आरोपांची दिली पुराव्यासहित उत्तरं