भाजप-शिवसेनेचे भांडण म्हणजे ‘वरून तमाशा,आतून कीर्तन’ ! – अशोक चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : मागील ४ वर्षात भाजप आणि शिवसेनेने महाराष्ट्राची केवळ फसवणूक केली आहे. विकासाच्या नावाखाली राज्याची दिशाभूल होत असून, त्यांची भांडणेसुद्धा दिखाऊ आहेत. सत्तेतील दोन्ही पक्ष आपसात कितीही भांडत असले तरी त्यांची भूमिका ‘आपण दोघे भाऊ, मिळून-मिळून खाऊ’ अशीच आहे. त्यांची भांडणे म्हणजे ‘वरून तमाशा, आतून कीर्तन’ असल्याची बोचरी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेंतर्गत अमरावती विभागातील चौथ्या टप्प्याचा समारोप करताना ते बोलत होते. चिखली येथे आयोजित या जाहीर सभेला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे, माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार, आ. यशोमती ठाकूर, आ. हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, दिलीपकुमार सानंदा, आशिष देशमुख, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, शाम उमाळकर, संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस रामकिशन ओझा, शाह आलम, जयश्रीताई शेळके आदी नेते प्रामुख्याने उपस्थित होते.

Loading...

या सभेला संबोधित करताना सर्वच वक्त्यांनी भाजप-शिवसेनेवर कडाडून हल्ला चढवला. खा. अशोक चव्हाण म्हणाले की, हे सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे. ‘आपलं सरकार’ या भाजप-शिवसेना सरकारच्या घोषणेचा धागा धरून ‘आपलं सरकार, घोषणा दमदार’ असाच या सरकारचा कारभार असल्याचे त्यांनी सांगितलं. या सरकारला ‘फसणवीस’ सरकारच म्हटले पाहिजे. सरकारकडे नियोजन नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसा शिल्लक राहिलेला नाही. म्हणूनच अजूनही कर्जमाफी पूर्ण झालेली नाही. हे महाराष्ट्रासाठी दळभद्री ठरलेले सरकार आहे, असे सांगून पुढील निवडणुकीत हे सरकार उलथवून लावण्याचे आवाहन त्यांनी केले.

मागील ४ वर्षांमध्ये या सरकारने लोकांना अपेक्षाभंगाशिवाय दुसरे काहीही दिलेले नाही. खोट्या घोषणा केल्या, खोटी स्वप्ने दाखवली, खोटी आश्वासने दिली. बुलढाणा जिल्ह्यातील मोहखेड हे गाव जलयुक्त शिवारमध्ये पाणीदार झाल्याचा दावा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केला. पण काँग्रेसने वस्तुस्थिती समोर आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांना चूक कबूल करावी लागली. हे जलयुक्त नव्हे तर झोलयुक्त सरकार आहे. सरकारच्या अशाच फसव्या कारभारामुळे संपूर्ण देशभर भाजप विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला केवळ ३० टक्के मते मिळाली. पण उर्वरित धर्मनिरपेक्ष ७० टक्के मतांचे मोठे विभाजन झाल्याने भाजप सत्तेत आली. पुढील निवडणुकीत हे विभाजन टाळण्यासाठी सर्वच समविचारी, धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत महाआघाडी करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार