काश्मीरमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड, दुर्दैवाने हाताच्या चिन्हलाचं धोका

OmarAbdullah

टीम महाराष्ट्र देशा : लोकशाहीच्या कुंभमेळ्याला आज सुरुवात झाली आहे, लोकसभेसाठी पहिल्या टप्यातील मतदान सध्या पार पडते आहे. विदर्भातील ७ जागांसह देशभरातील ९१ मतदारसंघात मतदान होत आहे. मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत असून सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली आहे. मात्र काश्मीर खोऱ्यात मतदान केंद्रामधील इव्हीएम मशीन मध्ये बिघाड असल्याचे निदर्शनास आले आहे. दुर्दैव म्हणजे कॉंग्रेसच्या चिन्हासमोरचं बटन दाबले जात नसल्याचं सांगण्यात येत आहे.

काश्मीर मधल्या पुँछ येथील भागात ही घटना घडली असून याबाबतची माहिती खुद्द नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन दिली आहे. तर त्यांनी यासंदर्भातला व्हिडीओ देखील व्हायरल केला आहे. या व्हिडीओ मधले हाताच्या चिन्हा समोरचे बटन दाबले जात नसल्याच सांगत आहेत.

देश सध्या डिजिटलायझेशन मधून जात आहे असा गवगवा सरकार कडून केला जात आहे. तरी देखील अनेक वेळा ईव्हीएम खराब होऊन मतदानावर परिणाम झाल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे नको त्या गोष्टीत डिजिटलायझेशन करण्यापेक्षा अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टीत डिजिटलायझेशन करा अशी मागणी नागरिक करत आहेत.

दरम्यान आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, उत्तराखंड, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि तेलंगणातील सर्व लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशच्या आठ जागा, बिहारच्या चार जागा तर आसाम आणि महाराष्ट्रातील सात जागा, ओडिशातील चार जागा आणि पश्चिम बंगालच्या दोन जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे.