भंडारा – गोंदियात इव्हीएम बंद; ही तर सरकारची मिलीभगत – प्रकाश आंबेडकर   

prakash-ambedkar 06

भंडारा – भाजपचे बंडखोर खासदार  नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे भंडारा – गोंदिया लोकसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली होती . आज या मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र येथिल अनेक मतदार केंद्रांवर इव्हीएम बंद असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

येथे ४५० मतदान यंत्रे बंद असून ही यंत्रे निवडणूक आयोग आणि सरकारने जाणीवपूर्वक कारस्थान करीत बंद केल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच गोंधळामुळे भंडारा-गोंदियात फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आंबेडकर म्हणाले, भंडारा-गोंदिया हा आदिवासी बहुल भाग आहे. भंडाऱ्यात सध्या ४७ डिग्री तापमान असून मतदान यंत्रे पुन्हा सुरु होऊन मतदान करता येईल यासाठी येथे अनेक तास मतदार ताटकळत बसले आहेत. बंद मतदान यंत्रांची देखभाल कशी करण्यात आली ती कोणी केली त्या लोकांची नावे निवडणूक आयोगाने उघड करावीत अशी मागणी देखी त्यांनी यावेळी केली.