अरे बापरे! ‘आता शाळेच्या मतदानासाठी होतोय ईव्हीएमचा वापर’

टीम महाराष्ट्र देशा:- राज्यात आणि केंद्रात विरोधकांकडून ईव्हीएमला जोरदार विरोध आहे. अशातच राज्यात ही अशा प्रकारचं चित्र पाहिला  मिळत आहे. पण अकोल्यात ईव्हीएम बद्दल एक सकारत्मक उपक्रम राबवला गेला आहे. पाचमोरी येथील जिल्हा परिषद या शाळेत मंत्रिमंडळ निवडण्यासाठी ईव्हीएम पद्धतीचा उपयोग करण्यात आला आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली.

विशेष म्हणजे ही निवडणूक प्रक्रिया मोबाईलद्वारे घेण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया कशाप्रकारे पार पडते, यासर्व विषयी माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने ही निवडणूक घेण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६ जागांसाठी ८ उमेदवार उभे होते. प्रत्येक मतदाराला ६ जागांसाठी मत देण्याची मुभा होती. ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडली.

Loading...

मतदान केलेल्या विद्यार्थ्यांच्या बोटावर शाई लावण्यात आली. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सर्वांसमोर निकाल जाहीर केला. या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना शालेय कॅबिनेट पद देण्यात आले. यात आरोग्यमंत्री, क्रीडामंत्री, शिक्षणमंत्री या पदांचा समावेश होता. शाळेच्या या अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती झाली. त्यामुळे या शाळेचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत