ईव्हीएम हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. आता पर्यंत राज्यात पारदर्शी मतदान पार पडले आहे. मात्र राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ईव्हीएम मशीन मध्ये गडबड होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ट्विट करत ही शक्यता वर्तवली आहे.

Loading...

मी अनेक मतदारसंघात फिरलो. लोकांचे मत सरकारविरोधी आहे. पण ईव्हीएम हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो किंवा ईव्हीएम मध्ये गडबड केली जाऊ शकते. असा आशय पवार यांनी ट्विटमध्ये लिहिला आहे.

तसेच प्रचार संपल्यानंतर मी बारामती मतदारसंघात थांबू नये, अशी तक्रार भाजपकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली. बारामतीत सभेनंतर माझा काही कार्यक्रम नव्हता. पण बारामतीमध्ये माझे घर शेती आहे. त्यामुळे मला माझ्या घरी थांबू दिले गेले नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.Loading…


Loading…

Loading...