इंदुरीकरांच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ बेताल वक्तव्याचे पुरावे दिलेत : अंनिस

नगर : कीर्तनकार इंदोरीकर यांच्याविरुध्द अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अन्य काही संघटनांनी जिल्हा शल्यचिकित्सक व पोलिसांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. पुरावे दिल्यास कारवाई करू’, अशी भूमिका जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतली होती. सायबर सेल पोलिसांनी इंदोरीकरांचे व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध नसल्याचा अहवाल दिला होता.

त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांना त्या’ व्हिडिओबाबतचे पुरावे दिले आहेत.मात्र पुरावे देऊनही १५ दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास इंदोरीकरांसह जिल्हा शल्यचिकित्सकांविरुद्ध फिर्याद दाखल करू, असा इशारा अंनिसच्या राज्य कार्यवाह ऍड. रंजना गवांदे यांनी आज दिला.

Loading...

दरम्यान, अंनिस’ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की इंदोरीकर यांनी मूल जन्माबाबतचे वादग्रस्त वक्तव्य उरण तालुक्यातील इंचगिरी येथे दोन जानेवारी रोजी केले होते. ते सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर यू-ट्यूब चॅनेलवर दबाव आणून ते व्हिडिओ डिलीट करण्यात आले. इंदोरीकर यांनी असेच वक्तव्य फेब्रुवारी 2019 मध्ये नगर जिल्ह्यातील शेलद येथेही केले आहे.

इंदोरीकरांच्या विधानावरून चर्चा सुरू झाल्यानंतर 12 फेब्रुवारी 2020 रोजी नोटीस पाठविली. त्यानंतर इंदोरीकर यांनी बीड येथे कीर्तनात त्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले. त्यानंतर दिलगिरी व्यक्त केली. सरकारी वकील आणि वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. असे स्पष्टीकरण नगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर दिले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती