‘प्रत्येक गोष्ट लोकांची जबाबदारी तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलय काय?’ : निलेश राणे

nilesh rane

मुंबई : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला होता. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली होती. महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते, त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी हे स्पष्ट केलं होत.

त्यावरच भाजप आणि मनसेने हा मुद्दा सातत्याने लावून धरत महाविकासआघाडी सरकारची कोंडी केली. लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष नेते आक्रमक झाले आहे. याच मुद्यांवरून विरोधीपक्ष नेत्यांमध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळात आहे. दरम्याम, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही या वादात उडी घेतली. ट्विटरवरुन सोमय्या यांनी ‘माझे लाईट बिल माझी जवाबदारी’ असं म्हणतं ठाकरे सरकावर निशाणा साधला.

याच मुद्यांवरून आता निलेश राणे यांनी ट्विट करुन राज्य सरकारला धारेवर धरले. ‘अगोदर माझं कुटुंब माझी जबाबदारी, आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी. ठाकरे सरकार सुधरणार नाही. प्रत्येक गोष्ट लोकांची जबाबदारी तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय काय,’ असा सवाल निलेश राणे यांनी विचारला.

महत्वाच्या बातम्या