सरकारमध्ये सगळं काही अजित पवारच करतात

टीम महाराष्ट्र देशा – कोकणातीत बडे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि महाआघाडी सरकारवर टीका केली आहे. ठाकरे – राणे वाद कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत राहणारा विषय आहे.

आता माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री काही करत नाहीत सगळं अजित पवार करतात, असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे.

Loading...

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवाचा ठराव मांडण्यात कसलीच अडचण नव्हती. मात्र या प्रस्तावामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नाराज झाल्या असत्या आणि त्यांनी सरकारमधील पाठिंबा काढून घेतला तर घरी जावं लागलं असतं, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

विधानसभेमध्ये सावरकरांचा गौरवाचा प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला. मी अध्यक्षांना काही बोलत नाही. मात्र सत्ताधाऱ्यांना विचारतो कायद्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर मोठे नाहीत का? असा सवालही राणेंनी केला आहे.

दरम्यान, मी सत्ताधारी पक्षाचा निषेध करतो. काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष कुणासाठीही सत्तेत नाहीत. ते स्वत:च्या फायद्यासाठी एकत्र आले आहेत, अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.

हेही पहा –

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका