सर्वांची आवडती ‘आर्ची’ म्हणजेच रिंकू राजगुरूने काय केले आवाहन…

rinku-rajguru

मुंबई : ‘आर्ची’ म्हणून सर्वपरिचित झालेली तसेच पहिल्याच चित्रपटाद्वारे सर्वांची लोकप्रिय ठरलेली आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू. तिने नुकतचं ‘कोरोना लस’ बद्दल जणजागृतीपर आवाहन केले आहे. काय आवाहन आहे ते बघू या.

‘कोरोना संपला म्हणून काही लोक लस घेत नाहीत, मात्र असं करू नका’. मी लस घेतली आहे, तुम्ही पण लस घ्या असे आवाहन सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हीने एका व्हिडिओद्वारे केले आहे. कोविड आजारामध्ये आपले शेजारी, नातेवाईक यांचा मृत्यू झाला. हे टाळण्यासाठी आणि तिसरी लाट रोकण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे. सध्या महाराष्ट्र शासनाच्या मिशन कवच कुंडल या मोहिमे अंतर्गत मुबलक प्रमाणात लस उपलब्ध असतांनाही कोराना संपला असं समजून, लोक लस घेत नाहीत, तर असं करू नका, तुमचे दोन्ही डोस घ्या आणि सुरक्षित व्हा. कारण तुमचा जीव खूप मौल्यवान आहे, असे म्हटलं आहे.

तसेच तुमच्या कुटूंबियांसाठी हे खूप महत्वाचं आहे. जवळच्या उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय किंवा उपजिल्हा रूग्णालयात जाऊन लस घ्या, असे ही आवाहन अभिनेत्री रिंकूने केले आहे. देशातील जनतेपर्यंत हा मेंसेज तळागाळापर्यंत पोहंचावा हाच उद्देश असून सगळयांनी याचा लाभ घ्यावे असे ही आवाहनात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या