जिनिलियाच्या मराठमोळ्या अंदाजावर खिळल्या सर्वांच्या नजरा

jiniliya deshmukh

मुंबई : बॉलीवुडमधील सर्वात ‘क्युट कपल’ म्हणजे रितेश-जेनेलिया. हे दोघेही सोशल मीडीयावर नेहमी सक्रिय असतात. रितेश-जिनेलिया यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोवर लाईक आणि कमेंटचा नुसता पाऊस पडतो. रितेश आणि जिनेलियाच्या प्रेमाची नेहमीच चर्चा होत असते. नुकतेच जिनिलीयाने पारंपारिक सुंदर लुक केला आहे. याचे खास फोटो तिने सोशल मिडीयावर शेअर केले आहे.

महाराष्ट्राची संस्कृती जपत साडीतील काही फोटो जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने लाल रंगाची सुरेख साडी नेसली आहे. तसेच केसात गजरा आणि हातात हिरवा चुडा भरला आहे. तिचा हा लुक पाहून सर्वांचे तिच्याकडे लक्ष वेधले आहे.

जिनिलीयाचा हा लुक सर्वांच्या पसंतीस पडत असून, तिच्या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वीच रितेशने त्याची दोन मुले गणपतीची आरती म्हणत असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ते पाहून नेटकऱ्यांनी देखील त्यांचे कौतुक केले होते.

महत्त्वाच्या बातम्या