‘संविधानाच्या मार्गाने जे काही करण्यात आले आहे त्या सर्वांचा सन्मान करायला हवा’

‘संविधानाच्या मार्गाने जे काही करण्यात आले आहे त्या सर्वांचा सन्मान करायला हवा’

kiren rijiju

नवी-दिल्ली : आज २६ नोव्हेंबरला भारतात संविधान दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. आजच्याच दिवशी १९४९ मध्ये भारतीय संविधान समितीने भारतीय राज्यघटनेचा अवलंब केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr.Babasaheb Ambedkar) यांच्या अध्यक्षतेखाली २६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधानाची अंबलबजावणी करण्यात आली. जवळपास २ वर्ष ११ महिने आणि १७ दिवस आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जगातील सर्वात मोठ्या संविधानावर काम करण्यात आले होते. दरम्यान, आज या भारतीय राज्यघटनेस ७१ वर्षे पूर्ण होत आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजीजू(Kiren Rijiju) यांनी संविधान दिनाच्या पूर्व संध्येलाच कायदा, संविधानाला पूर्ण जोर लावून विरोध करणास पुढे येणाऱ्या ‘काही घटकां’वर टीका केली आहे. तसेच आम्ही संविधान स्वीकारत नाही असे सांगणे काही लोकांना फॅशनेबल वाटत असल्याचा टोलाही रिजीजू यांनी लगावला. एका कार्यक्रमामध्ये बोलत असतांना रिजीजू म्हणाले की,’जेव्हा संसदेमध्ये एखादं विधेयक संमत होतं किंवा विधानसभेमध्ये काही कायदे संमत केले जातात तेव्हा आम्ही या अधिनियमानांचे पालन करणार नाही असं म्हणण्याची काहीच गरज नसते.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’शहरांमध्ये आपल्याला जे जाणवत नाही. मात्र खोल विचार केल्यावर जाणवतं की काही अशी तत्व आहेत. हे फारच त्रासदायक आहे. जे काही कायदेशीर आणि संविधानानुसार आहे त्याचा कठोर विरोध केला जातो, हे चुकीच आहे.’

महत्वाच्या बातम्या: