प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, शिवसैनिकांच्या प्रवेशावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

ncp9_

पुणे : राज्यात शिवसेनेसोबत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी कुरबुर सुरूच आहे. राज्यात सत्ता येण्यापूर्वीच पारनेरला शिवसेना व राष्ट्रवादीचे जुगाड जमवून नगरपंचायतीत सत्ता आली होती. आता पुढील निवडणुकीच्या तोंडावर बेबनाव झाला असून शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे पारनेर शहरात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे वर्चस्व वाढले असून शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सत्ता आणल्यानंतर हे फोडाफोडीच राजकारण पहिल्यांदाच झाले असून आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्व उत्सुकतेने पाहत आहेत. हे तीन पक्षाचं सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचं विरोधकांच मत असून, आज बारामती मध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या प्रवेशाने पुन्हा सरकार मध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. तर या कोरोनाच्या महामरी काळात पुन्हा सुरु झालेल्या राजकारणामुळे नक्कीच वेगवेगळे अर्थ उपस्तिथ होत आहेत.

आमदार निलेश लंके यांनी आपली बाजू मांडताना हे ५ नगरसेवक राष्ट्रवादी सोबत काम करण्यास इच्छुक होते अशी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, जर हे नगरसेवक राष्ट्रवादी मध्ये घेतले नसते तर भाजपाच्या संपर्कात येऊन त्या पक्षात गेले असते असे उपमुख्यमंत्री अजित दादा पावर यांना स्पष्ट केल्यानंतरच आज त्यांच्या उपस्थित हा प्रवेश केला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा ला रोखण्यासाठी हि भूमिका घेतल्याचे देखील सांगत शेवटी महाविकास आघाडी भक्कम करत असल्याचे सांगितले आहे. तर शिवसेनेच्या स्थानिक गटातून मात्र या प्रकारावर नाराजी व्यक्त गेली गेली असून थेट उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री यांच्या पक्षाला खिंडार पाडल्याची चर्चा होत आहे.

दरम्यान आता या पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी, ‘प्रत्येक पक्षाला आपापल्या पक्ष वाढीचा हक्क असल्याची’ प्रतिक्रिया दिली आहे.तसेच हे सर्व नगरसेवक हे निलेश लंके यांना मानणारे असून जेव्हा लंके हे शिवसेनेमध्ये होते तेव्हा पासून ते सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

तर एकबाजूला आमदार निलेश लंके यांनी आपली बाजू मांडताना हे ५ नगरसेवक राष्ट्रवादी सोबत काम करण्यास इच्छुक होते अशी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, जर हे नगरसेवक राष्ट्रवादी मध्ये घेतले नसते तर भाजपाच्या संपर्कात येऊन त्या पक्षात गेले असते असे उपमुख्यमंत्री अजित दादा पावर यांना स्पष्ट केल्यानंतरच आज त्यांच्या उपस्थित हा प्रवेश केला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपा ला रोखण्यासाठी हि भूमिका घेतली असून महाविकास आघाडी भक्कम करत असल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना मोठा धक्का बसला असून त्यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी हा पक्ष प्रवेश झाल्याची चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकी वेळी आमदार निलेश लंके यांनी शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांचा पराभव करत विजय मिळवला होता.