नवी दिल्ली: देशात स्टार्टअप उद्योजकांशी आभासी माध्यमाद्वारे संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार दरवर्षी १६ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस’(National Start-up Day) म्हणून साजरा केला जाणार आहे. स्टार्टअपच्या जगात भारताचे नाव जे उद्योजक उंचावत आहेत, अशा सर्व स्टार्टअप उद्योजकांचे, तसेच कल्पक तरुणांचे पंतप्रधानांनी यावेळी अभिनंदन केले. स्टार्टअपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहचण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मोदींनी म्हटले आहे.
सध्या भारताचे लक्ष इनोव्हेशन, एंटरप्राइज आणि स्टार्टअपवर असल्याचेही ते म्हणाले आहेत. तसेच भारत नवकल्पना कशा प्रकारे संस्थात्मक करत आहे याबाबतही त्यांनी कौतुक केले. तर भारतात स्टार्टअप उद्योगाचे नियम बदलत आहेत. आणि स्टार्टअप उद्योग नव्या भारताचा आर्थिक कणा ठरत आहे.
Innovate for India and innovate from India. pic.twitter.com/T6HUkE1ilQ
— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १५० स्टार्टअप्स उद्योजकांसोबत संवाद साधला. यामध्ये कृषी, आरोग्य, उद्योजक, अवकाश, उद्योग, सुरक्षा, तंत्रज्ञान आधारित आर्थिक सेवा, पर्यावरण इत्यादींसह विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स या संवादात सहभागी झाले होते. स्टार्टअप्स देशात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय गरजांमध्ये कसे योगदान देऊ शकतात हे समजून घेणे हा या संवादाचा उद्देश होता.
महत्वाच्या बातम्या:
- ‘अशा प्रवृत्तीला आमच्या हद्दीत प्रवेश नाही’, गुळूंब ग्रामपंचायतीचे ‘स्टार प्रवाह’ला पत्र
- ‘शरद पवारांबद्दल बोलताना तारतम्य बाळगावे’; अजित पवार यांचा फडणवीसांवर निशाणा
- “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…”, फडणवीसांची शरद पवारांवर टीका
- “…म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला बळी पडल्याचे लक्षण”,किरण मानेंच्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंची टीका
- नाशिकच्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण; हायव्होल्टेज तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<