भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याप्रकरणी पोलीस चौकशीला हजर राहण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले होते. त्यामुळे सध्या सोमय्या पिता पुत्रांची चौकशी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी आज पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.
तसेच सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर देखील गुन्हा दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावर किरीट सोमय्या यांनी आम्ही सगळे सोमय्या चौकशीला सामोरे जायला तयार, असे सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –