fbpx

प्रत्येक धर्मात दहशतवादी आहेत,कमल हसन यांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

टीम महाराष्ट्र देशा- देशात निवडणुकांमध्ये विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी असणे अपेक्षित असताना देशात इतिहासावरून निवडणूक प्रचारामध्ये चिखलफेक सुरु आहे. स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू असून त्याच नाव नथुराम गोडसे आहे, असे वक्तव्य करत अभिनेता कमल हसनने केले होते यावरून मोठा वादंग माजला आहे.

कमल हसन यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी सारवासारव देखील केली होती मात्र या वादात भाजप नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी उडी घेतल्याने हा वाद मिटण्याऐवजी आणखी चिघळला आहे.

दरम्यान,चौफेर टीका झाल्यानंतर आता कमल हसन यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रत्येक धर्मात दहशतवादी आहेत असे धक्कादायक विधान कमल हसन यांनी केले आहे. हे वक्तव्य करून वक्तव्य करत कमल हासन यांनी पुन्हा एकदा सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

नेमकं काय म्हणाले कमल हसन ?

“दहशतवाद प्रत्येक धर्मामध्ये असतो. इतिहासामध्ये असे अनेक दहशतवादी आहेत जे वेगवेगळ्या धर्मांचे आहेत. मीदेखील हेच सांगायचा प्रयत्न करत होतो. प्रत्येक धर्मामध्ये दहशतवादी असतो. त्यामुळे आपण कोणत्याही जाती-धर्मावर आरोप-प्रत्यारोप करु शकत नाही. अमूक एक धर्म आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, किंवा नीच आहे असं आपण म्हणून शकत नाही. इतकंच नाही तर प्रत्येक धर्मामध्ये दहशतवाद असतो याला इतिहास साक्ष आहे. त्या दिवशीदेखील मी हाच मुद्दा मांडायचा प्रयत्न करत होतो”.