Share

Mohan Bhagwat | “भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदूच” ; मोहन भागवत यांचे वक्तव्य

Mohan Bhagwat | छत्तीसगड : भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदूच आहे, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी वक्तव्य केलं आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तिचा डीएनए हा एकच असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. मंगळवारी मोहन भागवत छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूर येथील त्यांच्या कार्यालयात एका स्वयंसेवक कार्यक्रमाला संबोधित करत होते. यादरम्यान त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. हे भारताचे प्राचीन वैशिष्ट्य आहे. संपूर्ण जगात हिंदुत्व ही एकमेव विचारधारा आहे, जी सर्वांना एकत्र आणण्यावर विश्वास ठेवते, असे मोहन भागवत म्हणाले.

मोहन भागवत म्हणाले, “RSS ची स्थापना झाल्यापासून मी म्हणत आलो आहे की भारतात राहणारा प्रत्येकजण हिंदू आहे. जे भारताला आपली मातृभूमी मानतात आणि या विविधता असूनही एकात्मतेच्या संस्कृतीवर विश्वास ठेवून एकत्र राहायचे आहे, ते हिंदू आहेत. धर्म, संस्कृती, भाषा, खाद्य किंवा विचारसरणी काहीही असो, सर्व हिंदू आहेत.”

देशात पूर्वीच्या तुलनेत स्वयंसेवकांची संख्या वाढली आहे. देशभरात वाढणारा स्वयंसेवकांचा हा गट अगदी वेगळा आहे. संघाबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही त्याची तुलना कोणाशीही करू शकत नाही. तुम्हाला संघाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास, तुम्हाला त्यात सामील व्हावे लागेल. जेव्हा आपण संघात प्रवेश करू तेव्हा त्याची महानता आपल्याला समजेल. संघ शाखेत कोणाची जात विचारली जात नाही, असे मोहन भागवत म्हणाले.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले, “संघाचे कार्य वैयक्तिक आणि राष्ट्रीय चारित्र्य घडवणे आणि लोकांमध्ये एकता आणणे आहे. त्याचबरोबर त्यांनी सर्वांच्या श्रद्धेचा आदर करण्यावर भर देत सर्व भारतीयांचा डीएनए समान असून त्यांचे पूर्वज समान आहेत. 40,000 वर्षे जुन्या ‘अखंड भारत’चा भाग असलेल्या प्रत्येक भारतीयाचा डीएनए समान आहे.”

महत्वाच्या बातम्या : 

Mohan Bhagwat | छत्तीसगड : भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदूच आहे, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी वक्तव्य केलं …

पुढे वाचा

India Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now