Sanjay Shirsat । मुंबई : आज शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतलेला पहिला भाग प्रदर्शित झाला. या मुलाखतीवर राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. यानंतर आता राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आलं येत आहेत. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी आता ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय शिरसाट पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले कि, एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले ते चुकीचे आहेत. आजारपणात काही घडलं नाही. तसेच तुम्ही आमची चिंता तुम्ही करू नका, आम्ही कशात जायचं, आमचा रस्ता आम्ही पाहू ना ! ज्या रूम मध्ये अमित शहा यांची उद्धाव ठाकरे बरोबर चर्चा झाली, त्याबद्दल काही बोलायचं नाही, पण त्यांचा संपर्क होत होता तेव्हा मात्र यांनी केला नाही. संजय राऊत यांच्या सारख्यानी खोडा घातला. शरद पवार मोठे नेते आहेत. मी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. पण शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ही होऊ शकत नाहीत. बाळासाहेबांशिवाय शिवसेना प्रमुख कोणीही होऊ शकत नाही. असं ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
संजय राऊत यांच्यासोबतच्या मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते कि, या मुलाखतीत शिंदे गट बाळासाहेबांवर हक्क सांगतोय का, असा प्रश्न विचारला असता, त्यावर उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला आव्हान दिलंय. ठाकरे म्हणाले, माझं आव्हान आहे, ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवा. मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. प्रत्येकाने मातृ देवो भव, पितृ देवो भव हे मानलं पाहिजे. स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत. त्यांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत, मतं घ्यावीत. माझे वडील का चोरताय?, असा सवाल त्यांनी बंडखोरांना केला.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | राणे आणि भुजबळ जे करू शकले नाहीत ते शिंदेंनी कसे केले ? उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण
- 5G Spectrum | पहिल्यांदाच अंबानी-अदानी समोरासमोर; 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू
- Shahjibapu Patil : संजय राऊतांचे पाऊल आमच्या छाताडावर यायच्या आत त्यांच्या डोक्यावर आम्ही पाय देऊ – शहाजीबापू पाटील
- Uddhav Thackeray | जी सडलेली पानं आहेत ती आता गळून पडतायत – उद्धव ठाकरे
- Udhdav Thackeray : शिंदे गटाविरुद्धच्या संघर्षात उध्दव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<