पुरोगामी महाराष्ट्रात आजही मांत्रिक, जादूटोणा सर्रास सुरु

गडचिरोली  : पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलानासाठी कायदा झाला असला तरीही गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही जादूटोणा व बाबाकड़े लोकांचे जाणे सुरु आहे. सिरोंचा तालुक्यातील अनेक ग्रामीण क्षेत्रात आज ही जादूटोणा व मांत्रिक बाबावरचा विश्वास मोठ्या प्रमाणात असलेल्या चित्र दिसून येत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यालयापासून ४ की मी अंतरावर असलेल्या एका गावातील चौकात अश्या प्रकारे निम्बु, अंडा मंत्र तंत्र चा वापर करून ठेवलेल्याचे आजही तालुक्यात पाहायला मिळत आहे. त्या मध्ये प्रामुख्याने कोंबडीचे अंडे,शिजवलेले अन्न (भात), लिंबू, सफेद कोहळा, हळद, कुंकू, एका कागदाच्या थालीत दिसून आली.

आज ही सिरोंचा तालुक्यात ग्रामीण क्षेत्रात जादू टोना व अंधश्रद्धा वर मोठया प्रमाणात विश्वास असलेले अनेक जण असल्याचे चित्र या तालुक्यात आहे. अंधपणाने टाकलेला विश्वास किंवा श्रद्धा आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात. अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा,नरबळी,तसेच भूत- प्रेत, पिशाच्च या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचा मानवी तसेच इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होणे म्हणजेच अंधश्रद्धा फोफावणे. भारतात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे.सिरोंचात ही मोठ्या प्रमाणात आहे अंधश्रद्धेमुऴे निरपराध जीवांचे बळी जातात. काही ढोंगी लोकांमुऴे, अशिक्षितांमुळे व जुन्या परंपरा आणि विचारसरणीमुऴे अंधश्रद्धेचे प्रमाण वाढत जाते. समाजातील अज्ञानाचा फायदा घेवून विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्राने २०१३ साली कठोर कायदा केला आहे. याचे संंक्षिप्त नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा, २०१३ असे आहे.

समाजामध्ये अनेक रूढी-परंपरा आपण आपल्या परीने जपत असतो. माणसाने नेहमीच श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा बाळगू नये. सणाच्या निमित्ताने दान-धर्म, उपवास केले जातात.दानधर्म केला जातो. खरं तर अशा पद्धती जरूर जपाव्यात. मात्र महत्त्व देताना त्या व्यक्तीला खरंच तुमच्या देण्याची गरज आहे का हे पाहावे. आता हेच बघा ना! आपण ज्याच्याकडे खूप काही असते, त्यालाच द्यायला उत्सुक असतो. पण ज्याच्याकडे नाही त्याचा विचारही डोक्यात घेत नाही. कामाला असणारी मावशीच काय पण आपल्या आसपास असे खूप जण असतात, ज्यांना आपल्या मदतीची खरंच गरज असते, पण होते मात्र उलटेच. आपण ज्या परंपरा जपतो त्यांचा योग्य उपयोग होतो का हे ही पाहिलेच पाहिजे. कोणीतरी सांगतो म्हणून करायचे. यापेक्षा तुमच्या मनाला पटणा-याच गोष्टी करा माणसाने श्रद्धा ठेवली तर त्याचा त्रास होत नाही. पण अंधश्रद्धेने मात्र बरीच कामे बिघडतात. सिरोंचा तालुक्यात आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनातही बरेच जण त्या परंपरांना व्यवस्थित जपतात. ही खरं तर चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे त्यांना स्वत:ला त्रास होत नाही ना याचीही त्यांनी स्वत:च काळजी घ्यायला हवी.

उपवास केल्याने आजारी व्यक्तींना त्रास होतो हे त्यांना डॉक्टरांनी, घरच्यांनी सांगितलेले असते.पण इतके दिवस केले अन् आता सोडले तर.. तर प्रकृती बिघडवणे योग्य आहे का? सोनारानेच कान टोचावे ही एक म्हण आपल्याकडे रूढ आहे, पण इथे तर डॉक्टरांचेही ऐकलं जात नाही. तसं तर स्त्रिांना, घरात बसणा-या असो किंवा कामाला जाणा-या असो त्यांना काम भरपूर असते. घरची काय कमी म्हणून बाहेरच्याही बर्‍याच जबाबदा-या त्यांच्यावर सोपवलेल्या असतात. मग या सा-या ताण-तणावात त्या स्वत:चे आरोग्य जपायचे विसरूनच जातात.स्वत:चे महत्त्व स्वत:च विसरतात ज्या स्त्रीला कामासाठी नेहमी सज्ज राहायचे असते तिने तर आपली प्रकृती, मन:स्थिती अन् सभोवतालचे वातावरण याची काळजी घेतलीच पाहिजे. फक्त हजारो वर्षापासून सार्‍यांनी हे केलं म्हणून मी हे करायचं.

यापेक्षा मला हे योग्य वाटते म्हणून मी ते करते हा निश्चय ठाम असायला हवा. तरच स्त्रीशक्तीचा ख-या अर्थाने जागर होईल. घरामध्ये सर्वाबरोबर स्वत:लाही महत्त्व द्यायला हवे. तसेच नको त्या गोष्टीचा ताण मनावर घ्यायला नको. अट्टहास केल्याने नेहमीच चांगले होते असे नाही तर ब-याच वेळेला स्वत:बरोबर सा-यांनाच त्रास होतो.