‘इंटरनेट नसलेल्यांनाही जगण्याचा अधिकार आहे’, राहुल गांधींचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल

rahul vs modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित करताना देशातील १८ वयोगटावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याबाबतची घोषणा केली. या घोषणेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानेही लसीकरणासाठीच्या ऑनलाईन नोंदणीच्या आवश्यकतेवर आक्षेप घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, नियोजन करणाऱ्यांना सत्य परिस्थितीची जाणीव असायला हवी.

तर आता आपल्या राहुल यांनी लसीकरणाआधीच्या ऑनलाईन नोंदणीवर आक्षेप घेतला आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, कोरोना लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या प्रत्येकाला लस मिळायला हवी. त्यासाठी ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता नसावी. कारण जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही.

राहुल गांधी यांनी कोरोनाविरोधी मोफत लसीकरणाच्या निमित्ताने मोदी सरकारला एक प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी म्हणतात, ‘एक सोपा प्रश्न, जर सर्वांसाठी लस मोफत असेल, तर खाजगी रूग्णालयांमध्ये ही लस देण्यासाठी पैसे का आकारले जात आहेत?’ असा सवाल त्यांनी केला. त्यांनी एकुणच खाजगी हॉस्पिटलमधील लसीकरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP