धो- धो पावसातही धैर्यशील माने यांनी सुरु ठेवली प्रचारसभा

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व उमेदवार नेत्यांच्या प्रचारांना उधान आले आहे. नुकतीच हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ केला. सभेच्या वेळी अचानक पावसाला सुरवात झाली. तरीही भर पावसात त्यांनी त्यांचे भाषण सुरूच ठेवले. धो धो पडणाऱ्या पावसात देखील भाषण न थांबवता माने यांनी सभा घेतल्यामुळे व्यासपीठावर असलेल्या मंत्र्यानाही पावसात बसावे लागले.

राज्यातील विधानसभा निवडणूका तोंडावर आल्याने आता प्रचारसभांचा जोर वाढला आहे. सांगलीच्या इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील युतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या प्रचारासाठी मंगळवारी (ता. ८) वाळवा येथील चौकात सभा पार पडली. राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह भाजपा-शिवसेनेचे मतदारसंघातील आणि सांगली जिल्ह्यातील अनेक नेते या सभेला हजार होते. सभा सुरु असताना हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांचे भाषण सुरू होताच अचानक पाऊस सुरु झाला. तरीही माने यांनी त्यांचे भाषण सुरूच ठेवले.

पाऊस सुरु होताच त्यांचे कार्यकर्ते उठू लागले मात्र त्यांनी कार्यकर्त्यांसह व्यासपीठावरील सर्वांना भर पावसात सभा पार पाडण्यासाठी जागेवरच बसण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत भर पावसात सभा सुरु राहिली. भाषण सुरु असताना काही वेळानंतर पावसाचा जोर वाढला. मात्र खासदार माने यांनी पावसातच सभा पार पाडायचा निर्धार पुन्हा बोलून दाखवला. त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांनाच पावसात बसावे लागले. भाषण संपेपर्यंत सर्वजण पावसात बसून राहिले. त्यांचे भाषण संपताच काही क्षणात ही सभा संपवण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या :