‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’

devedra fadnavis

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी शिवसेना-भाजपची युती केली,त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तेव्हा युती झाली नसती तर आमचा इथपर्यंत प्रवास झाला नसता, अशी कबुलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.पुढे बोलताना म्हणाले, आमच्या युतीच्या चर्चेमध्ये अडचण आली तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मोठय़ा मनाने निर्णय करायचे आणि त्यामुळे युती टिकायची. आताही आम्ही मार्ग काढू. चिंता कशाला करता, असे मिश्कील विधान फडणवीस यांनी केले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्याहीवेळी काहीवेळेला आमच्या युतीमध्ये अनेकदा अडचणीची वेळ आली, पण त्या अडचणीदेखील आम्ही दूर केल्या. आम्ही त्यावेळी लहान कार्यकर्ते होतो. आम्हाला त्यावेळेला ‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा.

Loading...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित ‘ठाकरे’ चित्रपट येत आहेत. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांना ‘मानाचा मुजरा’ करण्याचा ऐतिहासिक सोहळा सोमवारी नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडला. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ठाकरे यांना मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. हा कार्यक्रम येत्या रविवार, 20 जानेवारी रोजी कलर्स वाहिनीवरून सायंकाळी 7 वाजता प्रसारित होणार आहे.यासंदर्भातील वृत्त सामनामध्ये छापून आले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील