नागपूर : देवेंद्र फडणवीस प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, ‘मुंबई मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ’ या दोन्ही मेट्रोचं काम मी सुरू केलं होतं. अतिशय वेगाने ते काम पुढं गेलं होतं. काही कारणास्तव या सरकारमुळे ते रखडलं गेलं. परंतु आज त्याची सुरूवात होत आहे. आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल, पण सगळ्या मेट्रो सुरू करा.
तसेच पुढे म्हणाले, या दोन प्रकल्पानंतर मेट्रो ३ चा प्रश्न निकाली काढा. कारण मेट्रो ३ आतापर्यंत सुरू होऊ शकली असती. सरकारने मेट्रो ३ चा रखडलेला प्रकल्प हा लगेच पूर्ण करावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली दिली.
महत्वाच्या बातम्या –