सोलापूर : राज्याला स्थिर सरकार मिळाले, तर महागाई कमी होईल. अशी आशा वाटते. कारण, केंद्राकडून महागाई कमी होताना दिसत नाही. आज सिलिंडरचा दर ११०० रुपये झाला आहे. दोन वेळचे जेवण बनवणेही कठीण झाले आहे. तरीही कोरोनानंतर आलेल्या निर्बंधमुक्त नागपंचमीच्या सणामुळे आज सर्व आनंदित आहेत. आज सरकार बदलून ३२ दिवस झाले. तरीही फक्त दोघांवरच सरकार चाललंय. काय ते झाडी, काय ते डोंगार, असे त्यांचे जरी ओके असलं तरी महाराष्ट्रातील जनतेचं ‘नॉट ओके’ आहे, असा टोलाही काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आमदार शाहजीबापू पाटील यांना नाव न घेता लगावला.
आमदार शिंदे या नागपंचमीच्या निमित्ताने सोलापुरात आल्या होत्या. त्या वेळी माध्यमांशी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. प्रणिती शिंदे यांनी या वेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, संजय राऊत यांच्या ईडीच्या चौकशीवरून भाजपला लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की, खूप खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. जे प्रकरण २०१५ मध्ये बंद झालंय, ते आज पुन्हा काढून सोनिया गांधींना त्रास दिला जातोय. केवळ हम बोले सो कायदा दाखवण्याचे काम सुरू आहे. सोनिया गांधी या देशाच्या एवढ्या वरिष्ठ नेत्या, एका मोठ्या पक्षाच्या प्रमुख असून त्यांना दहा-दहा वेळा ईडीकडून चौकशीला बोलवले जाते. राहुल गांधी यांना बोलावून घेताय. सहा-सहा तास चौकशीला बसवताय आणि एकच तास चौकशी करताय, तीही व्यर्थ. ही कसली पद्धत, असा प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.
- Shahajibapu Patil | आम्ही एकनाथ शिंदेंना घेऊन गेलो, ते आम्हाला नाही – शहाजीबापू पाटील
- Shahjibapu Patil | “आम्ही मेलेल्या आईचं दूध नाही पिलं, ठोका देणारच”; शहाजीबापूंचा राष्ट्रवादीला इशारा
- Shahjibapu Patil : “मी माझ्या बायकोला महिना-महिना सापडत नाही आणि तुम्हाला…”; शहाजीबापूंचा माविआच्या नेत्यांना टोला
- Alia bhatt | “मी ब्रा का लपवायची?…”; आलिया भट्टच बोल्ड विधान
- Ajit Pawar |”राज्याचे प्रमुख नियम तोडतात, त्यांनी…” ; अजित पवारांचा मुख्यमंत्र्याना टोला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<