‘महाराष्ट्रात भूकबळी जातायेत, तरीही रोज स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा सोस कमी होत नाही’

atul bhatkhalkar

मुंबई: चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे. राहत्या घरातच दोघींचा मृत्यू झाल्यानं गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून हळहळ व्यक्त केली जात आहे. यावरूनच भाजपचे अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाना साधला आहे.

‘अन्नावाचून मायलेकींनी चंद्रपुरात घरातच तडफडून प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना उघड झाली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था राज्यात पूर्ण कोलमडली आहे. गरिबांना जगणे अशक्य झाले आहे. महाराष्ट्रात भूकबळी जातायत, तरीही रोज स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा सोस कमी होत नाही.’ अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान संबंधित घटना शनिवारी समोर आली आहे. झेलाबाई पोचू चौधरी (आई) आणि माया मारोती पुलगमकर (मुलगी) अशी मृत झालेल्या मायलेकींची नावं आहेत. या दोघीही भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत होत्या. मात्र काही दिवसांपासून झेलाबाई यांना दीर्घ आजाराने त्रासले होते. तर मुलगी माया हिलाही रोगाने ग्रासले. मात्र आजारपणामुळे त्या भिक्षा मागायला जाऊ शकल्या नाही. आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या :