मुंबई : १४ मे ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत भाजपाचं हिंदुत्व नकली असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी त्यांनी सभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर अनेक आरोप केले. या आरोपाला भाजपाकडूनही जोरदार प्रत्युत्तर मिळाले. आता या सभेवरच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
“आम्ही सडेतोड बोलतो, खरं बोलतो, बोगस माहिती देत नाही. उद्धव ठाकरेंचं परवाचं भाषण बोगस होतं. २५ वर्षांपेक्षा जास्त काळ युती केली आणि मुख्यमंत्रिपदासाठी गद्दारी केली. अडीच वर्षात तुम्ही काय काम केलं नाही. मंत्रालयात जायचं नाही, व्हिडिओ कान्फरन्सिंगद्वारे भाषण, असं काम सुरु आहे. पाकिस्तानशी लढाई झाली आणि यांना बघायला सांगितलं तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलतो म्हणतील”, अशी जोरदार टीका नारायण राणेंनी केली.
तसेच पुढे बोलताना नारायण राणे यांनी जोरदार घणाघात केला म्हणाले, मुख्यमंत्र्यांना जाहिरातबाजी करुन सभा घ्यावी लागली. बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे असूनही मला मुख्यमंत्री केलं. तुम्ही १० वर्ष मुख्यमंत्री राहिलात तरी माझ्या ८ महिन्यांच्या कामाची बरोबरी करु शकणार नाही. शिवसंपर्क अभियान नव्हतं तर शिव्या संपर्क अभियान होते.
महत्वाच्या बातम्या –