“पंतप्रधानांनी जरी चुकी केली असेल तर…”, गणपत गायकवाड यांचे मोठे वक्तव्य

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला असून भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी ईडीच्या कारवायांसंदर्भातही भाष्य केले.

यासंदर्भात बोलत असताना गणपत गायकवाड म्हणाले की,‘ईडी ही काही उद्देशाने कोणाच्या मागे लावण्यात आलेली नाही. ज्यांनी चुका केल्यात, भ्रष्टाचार केला, दोन नंबरचे धंदे केले त्यांचे भ्रष्टाचार उघड करण्याचे काम ईडीच्या हातात आहे. त्यामुळे या चौकशा होतात’, असे गायकवाड म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांविरोधात कारवाई होते, मग तो कोणीही असो. देशाच्या पंतप्रधानांनी जरी चुकी केली असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. त्यामुळे कुठल्या नेत्यावर किंवा मंत्र्यावर कारवाई होणे योग्यच आहे’, असेही गायकवाड यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: