‘काँग्रेसचे अस्तित्व संपत आले तरी त्यांना आमचीच चिंता’, पंतप्रधान मोदींचा टोला

नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता. अनेक टीका, खोचक वक्तव्ये अधिवेशनात पाहायला मिळाले. १३ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे. अधिवेशनात लोकसभेत गोंधळ पाहायला मिळाला. दरम्यान, आज भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत मोदींनी कॉंग्रेसवर टीका केली.

कोरोनाच्या संदर्भातील काही अफवा व खोटी माहिती विरोधक पसरवत आहे. त्यावर मोदींनी भाजपच्या खासदारांना सांगितले की, या मुद्द्यावरून ‘विरोधकांना प्रत्युत्त द्या. काँग्रेस आता संपली आहे तरी त्यांना भाजपची चिंता आहे’ अशा शब्दात काँग्रेसवर मोदींनी निशाना साधला. तसंच सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवा, त्यांना वारंवार सत्य सांगा असा मोदींनी भाजप खासदारांना सांगितले.

काँग्रेसकडून नकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही नरेंद्र मोदींनी यावेळी केला. दरम्यान, मोदी सरकारवर वारंवार विरोधी पक्षांकडून टीका होत असतात. देशाच्या आर्थिक स्थिती, इंधन दरवाढ तसेच कोरोनाची परिस्थिती याला जबाबदार केंद्र सरकार आहे असा आरोप विरोधकांकडून होतोय.

महत्त्वाच्या बातम्या

IMP