कॉंग्रेसने उमेदवारी दिली नाही तरीही लोकसभा निवडणूक लढवणार : डॉ. सुजय विखे पाटील

टीम महाराष्ट्र देशा– नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून आपण काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र, पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी, आपण ही निवडणूक लढणार आहोत. माझे वडील काँग्रेसचे नेते आणि आई काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद अध्यक्षा असल्या तरी, मला माझा पक्ष निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. असे वक्तव्य युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

सुजय विखे हे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र असून ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेस कडून इच्छुक आहेत. राहाता येथे निळवंडे धरणाच्या कालव्या संदर्भात डॉ. विखे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांंनी रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते.

Loading...

दरम्यान,राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक सर्वश्रुतआहे. त्यामुळे सुजय विखे यांच्या या वक्तव्याचा नगरकरांनी उचित अर्थ घेतला आहे. दरम्यान, विखे पाटलांवर भाजपच्या ‘बी’ टीमचा कॅप्टन म्हणून होणारी टीका या वक्तव्यातून पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर येत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश