कपडे लाॅन्ड्रीत टाकले तरी भाजपवाले मनी लॉन्ड्रींग केस करतील आणि…; राऊतांनी उडवली खिल्ली

sanjay raut

मुंबई : सध्या महाविकास आघाडीतच्या डोकेदुखीत वाढ होत आहे. कारण महाविकास आघाडीतील पक्षाशी संबंधित आणि अनेक मंत्री व नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे व बेनामी मालमत्तेचे गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर ‘डर्टी ११’ सह राखीव नेत्यांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना खासदार भावना गवळी, माजी मंत्री अनिल देशमुख, मंत्री अनिल परब, आमदार प्रताप सरनाईक यांच्यापासून ते मंत्री छगन भुजबळ असे अनेकांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा तपास लागल्याचे समोर आले आहे.

यावरून महाविकास आघाडीतील नेते हे भाजपवर टीकास्त्र सोडत असून एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरून भाजपची खिल्ली उडवली आहे. सरकार घाबरलंय असं चंद्रकांत पाटील म्हणतायत. मी देखील जेमतेम घाबरतच आलो आहे. चंद्रकांत पाटलांचे ईडी आणि सीबीआयचे लोकं माझ्यावर कधी झडप घालतील सांगता येत नाही. हे सारे लोक त्यांचेच आहेत. ईडी, सीबीआय शाखा आहेत त्यांच्या. मला माझे कपडे लाॅन्ड्रीत टाकायला भीती वाटते. ते मनी लॉन्ड्रींगची केस करतील. म्हणून मी देखील घरच्यांना सांगितलंय माझे कपडे लॉन्ड्रीत टाकू नका नाहीतर ते माझ्यावर केस टाकतील,’ असं मिश्किल विधान करत संजय राऊत यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.

किरीट सोमय्या मुश्रीफांविरोधातील २७०० पानी पुरावे घेऊन ईडीकडे दाखल !

किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखानामध्ये कोट्यवधी रुपयांची बेनामी शेअर कॅपिटल भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे घेऊन किरीट सोमय्या ठरल्याप्रमाणे आज दुपारी ईडीच्या कार्यालयात पोहोचले. ईडीमधील ४ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक झाली. कागदोपत्री पुरावे दिले आहेत, अशी माहिती सोमय्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या