‘गडकरींनी २०० कोटी वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाही’

prakash ambedkar

टीम महाराष्ट्र देशा – नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा कमीत कमी  ३ लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाही, असा दावा थेट प्रकाश आंबेडकर यांनी केला. अकोला लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यापूर्वी आंबेडकरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी हा दावा केला. यावेळी त्यांनी युती आघडीच्या भूमिकेवर चांगलीच टीका केली.

आंबेडकर म्हणाले की, आदिवासी, हलबा, मुस्लीम, बौद्ध आदि भाजपच्या विरोधात आहेत. आदिवासींवर अन्याय झाला. त्यामुळे नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा तीन लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाही. असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.