मुंबई : महाराष्ट्राशेजारील मध्यप्रदेशात भाजपचा मुख्यमंत्री आहे. तेथील सरकारने होम बार लायसन्सला परवानगी दिली आहे. तसेच येत्या १ एप्रिलपासून नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले जाणार आहे. त्यात द्राक्षांव्यतिरिक्त बेरीपासून वाईन बनवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात कपात करण्यात येणार आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil Thombre) यांनी भाष्य केले आहे. गाजर पार्टीच्या कोलांटउड्या पाहून गांडूळ सुद्धा लाजत असेल, असा टोला त्यांनी भाजपला नाव न घेता लगावला आहे.
रुपाली ठोंबरे पाटील ट्विट करत म्हणतात, ‘गाजर पार्टीच्या कोलांटउड्या पाहून गांडूळसुद्धा लाजत असेल? गाजरपार्टी, २ कोटी रोजगार, फेकाफेकी’ असा टोला रुपाली पाटलांनी ट्विट करत भाजपला लगावला आहे.
गाजर #पार्टी च्या कोलांट्या उड्या पाहुन गांडूळ सुद्धा लाजत असेल? #गाजरपार्टी #2कोटीरोजगार #फेकाफेकी pic.twitter.com/boeIHaHGZb
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) January 28, 2022
मध्यप्रदेश सरकारचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या या धोरणामुळे राज्यातील चार महानगरांतील विमानतळ आणि निवडक मॉल्समध्ये किरकोळ विक्रीसाठी मद्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. मंत्रिमंडळाने घरांमध्ये मद्याची साठवणूक करण्याची मर्यादाही वाढवली आहे. त्यामुळे आता लोक पूर्वीपेक्षा चार पट जास्त मद्य घरात ठेवू शकणार आहेत. याशिवाय ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपये आहे, ते घरीच बार उघडू शकणार आहेत. मध्यप्रदेश सरकारने विदेशी मद्यावरील अबकारी शुल्क १० वरून १३ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मद्याची मागणी वाढेल आणि विक्री अधिक होईल. असेही सरकारने म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “राज्यातील भाजप देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागलायं ”, राऊतांचे टीकास्त्र
- ‘शूटर दादी’ च्या स्मरणार्थ युपी सरकार बनवणार ‘शूटिंग रेंज’
- महाराष्ट्र ‘मद्यराष्ट्र’ होईल असे बरळणे हे झिंगलेल्या मनोवृत्तीचे लक्षण- संजय राऊत
- ‘सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी…’; संभाजी भिडेंनी सांगितला आर.आर. पाटलांचा किस्सा
- संभाजी भिडेंनी केली पंतप्रधानांकडे दारू बंदीची मागणी