ममता दीदींचा ‘खेला’ पाहून बडे नेतेही चक्रावले ; भाजपचे बडे नेते पराभवाच्या छायेत

mamta

कोलकत्ता : आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पद्दुचेरी या विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर होणार आहे. पाच राज्यात जरी निवडणूक असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे. खेला होबे म्हणून ममता बॅनर्जी यांनी भाजपला आव्हान दिले होते.

सुरुवातीच्या कलामध्ये तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसने २०७ जागांवर आगाडी घेतली आहे. तर भाजप ८१ जागांवर आघाडीवर आहे. परंतु आता भाजपचे बडे नेते लॉकेट चटर्जी आणि बाबुल सुप्रिया हे पराभवाच्या छायेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या कलांवर कोणत्याही प्रकारचं भाष्य करणं हे घाईचं होईल, असं मत पश्चिम बंगालचे भाजपचे प्रभाली कैलास विजयवर्गीययांनी म्हटलं. ‘संध्याकाळपर्यंत स्थिती स्पष्ट होईल. लॉकेट चटर्जी मागे राहतील याचा अंदाज आला होता. परंतु बाबुल सुप्रिया मागे राहतील याचा अंदाज नव्हता. चार पाच फेऱ्यांपर्यंत लॉकेट चटर्जी, स्वपन दास हे मागे राहतील याची कल्पपना होती,’ असं विजयवर्गीय म्हणाले आहेत.

‘चार-पाच फेऱ्यांनंतर हे लोकं पुढे येतील. बाबुल सुप्रियोंबाबत जाणून घेतल्यानंतर आश्चर्य वाटतंय. त्यांचा पराभव आम्हाला हजम होत नाहीये,’ असंही ते म्हणाले. यावेळी ते सुवेंदु अधिकारी यांच्या विजयाबद्दल आश्वस्त दिसले. ममता बॅनर्जी यांचा जवलपास २५ हजार मतांनी पराभव होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितल आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभेच्या मतमोजणीचा निकाल जसजसा पुढे सरकताना दिसत आहे तसतसे भाजपचे ग्रह फिरताना दिसत आहेत. कारण काहीवेळापूर्वीच नंदीग्राम मतदारसंघात पिछाडीवर असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर सुवेंदू अधिकारी यांना मागे टाकले आहे. आता सुवेंदू अधिकारी १४१७ मतांनी पिछाडीवर पडले आहेत. तर दुसरीकडे राज्यभरात तृणमूल काँग्रेसची जोरदार घोडदौड सुरु आहे. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा २०० ची वेस ओलांडेल, असे संकेत मिळत आहेत. तर २०० जागा मिळवण्याच्या वल्गना करणाऱ्या भाजपची शंभरीतच दमछाक होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP